मुंबई : महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेला पक्षात बाहेर गेलेल्यांची पुन्हा साथ मिळत आहे. त्यांची घरवापसी होत आहे. आता आणखी एक प्रभाग - 41चे अपक्ष शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची संख्या 86 वर पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात भाजपकडून करण्यात येत आहे. मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 4 अपक्ष नगरसवेक आमच्या संपर्कात असून त्यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. मात्र, शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आणि तुळशीराम शिंदे यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्नेहल मोरे यांनी प्रवेश केला. शिवसेनेतून बडतर्फ केलेले माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे यांच्या स्नेहल मोरे वहिनी आहेत.  तर तुळशीराम शिंदे पुन्हा स्वगृही परत आहेत. या दोघांचे शिवसेनेत स्वागत होत आहे.



सेना बंडखोर अपक्ष नगरसेविका स्नेहल मोरे यांचे दीर आणि माजी विभागप्रमुख सुधीर मोरे म्हणालेत, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. काही लोकांच्या चुकीच्या माहिती मुळे मला तिकीट नाकारली गेली होती. माझा निश्चय होता. मी निवडणूक जिंकलो आणि आता शिवसेनेत परत जात आहे. मला भाजपकडून ऑफर आली परंतु मी त्यांना सांगितले, मी एक शिवसैनिक आहे.


शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी केली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. तर काहींनी अन्य दुसऱ्या पक्षात जाऊन नशिब अजमावले. काहींना लॉटरी लागली तर काहींना मतदारांनी नाकारल्याने त्यांना घरीच बसावे लागले आहे. मुंबई पालिकेत 84 शिवसेना तर भाजपने 82 जागा पटकावल्या आहेत. 114 हा जादुई अकडा गाठण्यासाठी आता कसरत करावी लागणार आहे.