मुंबई : मुलुंडच्या विहार लेक परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सद्दाम हुसेन शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे. विक्रोळी पार्कसाइट परिसरात रहाणारा सद्दाम हा त्याच्या मित्रासह विहार तलावात काल दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास आला होता. 


पोहण्यासाठी पाण्यात उतरला असताना सद्दामला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही... आणि काही वेळातच तो बुडू लागला.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. परंतु, सद्दामचा मृतदेह हाती लागण्यासाठी तब्बल 21 तासांचा अवधी लागला.