मुंबई : आजपासून भाजप शिवसेना सरकारच्या तिस-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चतुर राजकीय खेळीमुळे हे अधिवेशन फडणवीस सरकारसाठी सोपं जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. 


तर शिवसेनेनं या चहापानाला उपस्थिती लावली. शेतकरी आत्महत्या, नोटबंदीमुळे महसूल तूट हे विषय विरोधकांतर्फे अधिवेशनात आक्रमकपणे मांडले जाणार आहेत.