मुंबई : सायन चुनाभट्टी इथं बिल्डरवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. अरिहंत ग्रुप ऑफ कंपनीचे जिग्नेश जैन यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलाय. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता बाईकरुन आलेल्या २ अज्ञात व्यक्तींनी जैन यांच्या ऑफिसजवळ हा गोळीबार केला. जैन यांच्यावर दोन राऊड फायर करण्यात आल्याचं गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी सांगितलंय. जखमी जिग्नेश जैन यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.


गोळीबाराची ही दृष्यं सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीत. अरिहंत बिल्डरच्या मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरात विकासकाची कामे सुरु आहेत. त्यामुळे झालेला हल्ला हा खंडणीसाठी झाला की यात आणखी काही आहे याचा शोध पोलीस करीत आहेत.