मुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट
मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
नवी मुंबई, ठाणे, कांदीवली, मुंबई आदी शहरात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम राहिल्यास याचा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईस्टन वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. तर मध्य रेल्वेची सेवा उशिरा असल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.
या पावसाचा जोर काय राहिल्यास मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईत बरसणाऱ्या पावसाचा एक्सप्रेसवर परिणाम नसला तरी ईस्टन वेवर दिसून येत आहे.