मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दोन वरिष्ठ वकिलांनी मोदींच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमशेद मिस्त्री आणि जब्बर सिंग यांनी ५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. सामान्य जनतेला या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याची याचिका यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.


केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, याकडं याचिकेत लक्ष वेधण्यात आलं आहे. हा कायदेशीर आणि गुंतागुंतीचा मुद्दा असल्यानं सुट्टीकालीन न्यायालयाने पुढील आठवड्यात याचिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.