महाराष्ट्रात उन्हाचा कहर, या शहरात सर्वाधिक तापमान
किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर उन्हानं कहर केलाय.. राज्यातील अनेक भागात पा-यानं चाळीशी पार केलीये.
मुंबई : किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर उन्हानं कहर केलाय.. राज्यातील अनेक भागात पा-यानं चाळीशी पार केलीये.
चंद्रपूर विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरलंय. चंद्रपूरमध्ये 46.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आलीय.
चंद्रपूरमध्ये नोंदविण्यात आलेलं तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान ठरलंय. संपूर्ण विदर्भात १५ एप्रिलपासून पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.