छगन भुजबळांना दाखल केले अतिदक्षता विभागात
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आर्थररोड तरुंगात कोठडीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या छातीत काल दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना आयसीयूत हलविण्यात आलेय.
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आर्थररोड तरुंगात कोठडीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या छातीत काल दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना आयसीयूत हलविण्यात आलेय.
रक्तदाब वाढल्याने हलविले
काल दुपारी तुरुंगामधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या सुमरास सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तदाब १८०-१२० पर्यंत पोहोचला होता. त्यांना तत्काळ आयसीयूत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयात होणार उपचार
भुजबळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या प्रकृतीत पुरेशी सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, असे डॉ. रोहन सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.