मुंबई : गेली आठ महिने जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात पुन्हा तब्येतीवर आधारीत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण त्या आधीच बॉम्बे हॉस्पिटल मध्ये एडमिट असलेल्या छगन भुजबळांच्या अँजीओप्लास्टीसाठी बॉम्बे हॉस्पिटलने जे जे हॉस्पिटलला पत्र लिहले. 


हे आता संशयाच्या भोव-यांत आलंय. कारण अँजीओप्लास्टी करण्यासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना बॉम्बे हॉस्पिटलमध्येच अँजीओप्लास्टी करण्यासाठी अट्टाहास का? असा सवाल आता केला जातोय. आणि याचिकेआधी जे जे ला पत्र कसे हा आता चर्चेचा विषय झालाय.