मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्ताने मदतीचे आवाहन
दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जाहिराती तसंच होर्डिंग्ज ऐवजी जलयुक्त शिवार अभियानाकरता भरीव योगदान द्यावे, असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जाहिराती तसंच होर्डिंग्ज ऐवजी जलयुक्त शिवार अभियानाकरता भरीव योगदान द्यावे, असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीही आपला वाढदिवस साजरा न करता जलयुक्त शिवार योजनेसाठी सहाय्य करण्याचं आवाहन केले होते. त्याला संपूर्ण राज्यभरातून अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला होता.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच, राज्यातली २४ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याकरिता, जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती.