मुंबई : मुंबईतल्या फिल्मी जीवनाचे आकर्षण यामुळे तरुण मुले आपले घर सोडून मुंबईची वाट धरतात, हे आत्तापर्यंत अनेकदा समोर आलं होतं... पण, आता मात्र मुंबईतल्या झगमटातला बाप्पा पाहण्यासाठी मुलांनी घर सोडलेलं पाहायला मिळालंय.   
 
मुंबईतील बाप्पाच्या मोठं-मोठ्या मूर्त्या, भव्य डेकोरेशन आणइ त्यांना शोभणाऱ्या लाइटिंग हे पाहण्यासाठी घरात न सांगता मुले मुंबईला आलीत. गेल्या १५ दिवसांत जवळपास ४० मुले अशी आढळली आहेत. 


ठाण्यात समतोल फाऊंडेशन गेली दहा वर्षांपासून अशा घरातून पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसनाचं काम करत आहे. आत्तापर्यंत अशा सहा हजार मुलांना आपल्या राहत्या घरी परत पाठवण्यात आलंय.  सध्या अशा मुलांचं मनपरिवर्तन करण्यासाठी 'समतोल'नं गणपती बाप्पाचं आगमनच आपल्या कार्यालयात केलं आहे.