मुंबई : आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक काळामध्ये जर आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्हाला थेट फोटो काढून तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने COP(citizen on petrol) हे अॅप विकसित केले आहे.


या अॅपच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग होत असल्यास त्या ठिकाणचा आणि घटनेचा फोटो काढून अपलोड करता येणार आहे. हा फोटो त्या ठिकाणापासून दोन किमी परिसरामध्ये असलेल्या आचार संहितेबाबत लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्याकडे जाईल. त्यानंतर संबंधित अधिकारी याबाबत लक्ष घालतील.


खबरदार, खोटी तक्रार दाखल कराल तर...


अर्थात खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्ती विरोधात सरकारी कामांत अडथळा आणल्याबद्दल कारवाई होऊ शकते.


हे अॅप राज्यपाल विद्यासागर यांनी लॉन्च केले. अनेक ठिकाणी मतदान का कमी होते, याबाबत सर्व्ह केला पाहिजे आणि याबाबत काम केले पाहिजे, असं मत राज्यपाल यांनी व्यक्त केले.


तर सुशिक्षित भागांतच मतदान कमी होत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने आयुक्त जे सहारिया यांनी सांगितलं.