मुंबई : घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या फळवाल्याने मराठी माणसाला गाडी लावण्यास विरोध केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी मनसेला क्लीन चीट दिली आहे. कुठल्याही किरकोळ भांडणातून झालेल्या वादात राजकीय पक्षाने मारहाण केली असं म्हणता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. परप्रांतीयांना मारहाणीचे प्रकार राज्यात होत नाहीत असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.