मुंबई : राज्यात सध्या हवामानात बदल दिसून येत आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीनंतर आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत: १५ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी वादळ होण्याची शक्यता असेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबई ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदवण्यात आल्यानंतर आता मात्र ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. काही ठिकाणी तापमान स्थिर आहे.


कोकणात कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी थंडीची लाट आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भात कमाल तापमानात घट झाली आहे. मराठवाड्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिलेय.