मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 'मन की बात'मधून कॅशलेस ट्रान्सक्शन बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, अर्थखात्याचे सचिव ,ई ट्रान्सक्शन करणाऱ्या कंपनी यांच्या प्रतिनिधी बरोबर आज बैठक केली.


ग्रामीण भागात असे होणार कॅशलेस ट्रान्सक्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- ग्रामीण भागात कॅशलेस ट्रान्सक्शन कसे करता येईल याबाबत चर्चा झाली.


-  ग्रामीण भागात शेतकरी मान्यताप्राप्त डिलरकडून बियाणं खत घेताना कॅशलेस ट्रान्सक्शनसाठी आता बँकेमध्ये उद्यापासून एक फॉर्म उपलब्ध असणार आहे. 
- शेतकरी किती पैसे आणि मान्यताप्राप्त डिलरची माहिती त्या फॉर्म मध्ये देण्यात येणार आहे. 
-बँक पैसे तात्काळ डीलरच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे. 
- ती स्लिप डिलरला दाखवल्यावर शेतकरी तिथून सामान घेऊ शकणार आहे. 
- मुख्यमंत्र्यानी आज घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला, बँकांना तसे आदेश दिलेत
- शेतकऱ्यांना बियाणं, खात, कीटकनाशक खरेदी करताना कॅशलेस ट्रान्सक्शन व्हावे म्हणून निर्णय घेण्यात आला आहे.