मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधकांचं सज्जड दम दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विरोधकांचं नाक दाबण्यासाठी अनेकांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांना रोखण्यासाठी माझ्याकडे खूप अस्त्र आहेत. कुणासाठी कोणतं अस्त्र वापरायचं हे मी ठरवणार' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिवसा तारे दाखवलेत.


सोबतच, 'तुम्ही विरोधकांची चिंता न करता तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना न डगमगता सामोरं जा' असं त्यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितलंय.


मराठा मोर्चाबद्दल काय म्हणतायत मुख्यमंत्री...


मराठा मोर्चा हा सरकारविरोधात नसून प्रस्थापितांच्या विरोधात आहे. त्यामुळं मराठा मोर्चाला घाबरू नका... हा गेल्या चाळीस वर्षांचा आक्रोश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतल्या भाषणात नमूद केलं.