मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. आरोग्याला ते नेहमीच प्राधान्य देतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी याने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. त्याच्या मेहनतीचे सर्वांनी कौतुक केले. अनंतने वजन कमी करण्याचा पण केला होता आणि त्याने ते पूर्ण केले. असाच काहीसा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 


मुंबई मिररच्या वृत्तानुसार, फडणवीस यांनी तीन महिन्यांत १८ किलो वजन घटवलेय. डिसेंबरमध्ये जेव्हा त्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट केले तेव्हा त्यांचे वजन १२२ किलो होते. मात्र अवघ्या तीन महिन्यांत त्यांचे वजन १०४ किलोपर्यंत कमी झालेय. त्यांना ८८-९० किलोपर्यंत वजन घटवायचे आहे. सध्या सुरु असलेले डाएट त्यांनी कायम ठेवल्यास पुढील काही महिन्यांत ते नक्कीच ९० किलोपर्यंत वजन कमी करु शकतील. 


सध्या मुख्यमंत्री प्रोटीन्स, फॅट्स यांचा समतोल असलेले पदार्थ म्हणजेच चिकन, फिश, पनीर, डाळ यांचे सेवन करतात. त्याचबरोबर भाज्या, फळांमध्ये ते डाळिंब, सफरचंद आणि जांभूळला प्राधान्य देतात. तसेच भाकरी, चपाती अथवा गव्हाचा ब्रेडचाही त्यांच्या आहारात समावेश असतो.