कलर्स मराठीचा मुंबई पोलीस दिवाळी मेळावा
दिपावली सणानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि कलर्स मराठी वाहिनी यांचे सयुंक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांसाठी गुरुवारी २७ ऑक्टोबर, २०१६ रोजी `उत्सव -२०१६ ` संगीत रजनी कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर येथे संपन्न झाला.
मुंबई : दिपावली सणानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि कलर्स मराठी वाहिनी यांचे सयुंक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांसाठी गुरुवारी २७ ऑक्टोबर, २०१६ रोजी "उत्सव -२०१६ " संगीत रजनी कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर येथे संपन्न झाला.
मुंबापुरीच्या रक्षणासाठी नेहेमीच पोलीस विभाग सदैव सतर्क असतो, मग ते लोहमार्ग पोलीस असो वा अन्य विभाग. कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन चोखरीत्या पार पाडले जात आहे कि नाही याच्यावर त्यांचे कटाक्षाने नियंत्रण असते. याच आपल्या लोहमार्ग मुंबई पोलीसांच्या सन्मानाखातर आणि हे सगळे पोलीस अधिकारी आपल्यासाठी करत असलेल्या मौल्यवान कार्यासाठी कलर्स मराठीने त्यांना एक मानवंदना देण्यासाठी वा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी मेळावा म्हणजेच “उत्सव २०१६ – संगीत रजनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृहराज्यमंत्री-ग्रामीण दिपक केसरकर, खासदार किरीट सोमय्या आणि राज्याचे पोलीस महांसचालक सतीश माथुर उपस्थित होते.
हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.