मुंबई : राज्यात सर्व सातबाराचं येत्या एका महिन्यात संगणकीकरण करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत बोरिवली इथला एक भूखंड महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने खाजगी व्यक्तीमार्फत हडपल्याबाबतचा प्रश्न शिवसेनेचे अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. या लक्षवेधी सूचनेला महसूल मंत्री उत्तर देत होते.


सातबाराचं संगणकीकरण झाल्यानंतर भूखंडांच्या व्यवहारातले गैरप्रकार टळतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.