मुंबई : चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत नारायण राणे यांचे समर्थक म्हणून समजले जाणारे संदीप सावंत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप सावंत यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये कामे करताना अडचणींमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.


नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी संदीप सावंत यांना मारहाण केल्यामुळे राणे आणि सावंत यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.


दरम्यान, माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हेही शिवसेनेत परतले होते. त्यांच्यानंतर आता संदीप सावंत यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.