मुंबई : स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भट्टाचार्य यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. 


विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार थेट स्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयावर चालून गेले.  


दरम्यान, अरुंधती भट्टाचार्यांचं हे वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी राज्य सरकार सहमत नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलंय.