मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बाजारात २०-३० टक्के कमिशन घेऊन फिरताना दिसत आहेत... जे लोक या नोटा स्वीकारत आहेत ते या नोटा बँकांत कशा जमा करणार? त्यांना इन्कम टॅक्सच्या प्रश्नांना उत्तरांची भीती नाही का? असे प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, इथे 'कॅश इन हॅन्ड' फंडा व्यापाऱ्यांकडून वापरला जात आहे. व्यापारी आपल्या बिजनेसची बॅलन्स शीट बनवतात... इन्कम टॅक्स भरताना या बॅलन्सशीटमध्ये एक कॉलम 'कॅश इन बँक' आणि दुसरा कॉलम 'कॅश इन हॅन्ड' असा दाखवला जातो. व्यापारी याच 'कॅश इन हॅन्ड'च्या नावावर आपला काळा पैसा सफेद करत आहेत. 


२०-३० टक्के कमिशन आकारून हे व्यापारी जुन्या नोटा स्वीकारत आहेत. हाच पैसा बॅलन्स शीट दाखवताना 'कॅश इन हॅन्ड'च्या स्वरुपात दाखवला जाईल. 


जाणकारांच्या माहितीनुसार, काही बिल्डर जुन्या नोटांवर जुन्या तारखेवर फ्लॅट बुक करत आहेत... यासाठी ते ग्राहकांकडून ज्यादा पैसाही आकारत आहेत.