सहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.
मुंबई : सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.
शिवसेनेच्या खासदारांची बैठक सोमवारी रात्री झाली. त्यात नोटबंदीवरून शिवसेनेची रणनीती ठरवण्यात आलीय. मोदींच्या बैठकीतून मार्ग निघाला नाही तर संसदेत शिवसेना भाजप विरोधात दंड थोपटणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांना मोदींविरोधात आक्रमक होण्याचा मंत्र दिलाय.
त्याचा प्रत्यय संसदेत पाहायला मिळणार आहे. शिवसेना लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक होणार आहे. त्यामुळे संसदेत मतदानावेळी शिवसेना विरोधात गेली तर भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.