मुंबई : उद्याच्या दहीहंडीला मुंबईत राडा होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरावात जेवढे थर लावले, तेवढे थर लावणारच, असा गोविंदा पथकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे कोर्टाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसआरपीएफ, क्युआरटीची मदत घेण्यात येणार आहे. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यायत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आलीय. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस आणि गोविंदा पथकं यांचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


समन्वय समितीच्या सदस्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट


पोलिसांनी दहीहंडी मंडळं आणि दहीहंडी आयोजकांना नोटीसा बजावालया सुरूवात केल्यावर समन्वय समितीच्या सदस्यांनी मंगळवारी राज ठाकरेंची भेट घेतली.  


बजावलेल्या नोटीसामध्ये कोर्टाच्या निर्णयांचं पालन केलं नाही, तर कडक कारवाई करण्यात येईल असं बजावण्यात आलंय. त्यामुळे आता उद्यावर आलेल्या दहीहंडीचा उत्सव कसा साजरा करायचा हा प्रश्न आयोजकांना पडलाय. 


तर उच्च न्यायालयानं दिलेले मार्गदर्शक तत्व पाळावीच लागतील असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय. मनसेला दिलेली नोटीस ही खबरदारी घेण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं.