मुंबई : महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय. 


 १ जूनपासून याची अंमलबजावणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारभावापेक्षा २० रुपयांनी स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार असून १ जूनपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केशरी, बीपीएल आणि अंत्योदय. रेशनकार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. 


अन्न व नागरी पुरवठा खात्यानं मंजुरीसाठा हा प्रस्ताव अर्थखात्याकडे पाठवलाय. तसंच डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कायदा बनवण्यात येणार आहे. या कायद्याचा प्रस्ताव सध्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला असून अध्यादेश काढण्याचा सरकारचा विचार आहे.