मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर एका आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला असतानाच कुर्ला बैलबाजारमधील रेशनिंगच्या दुकानात करण निषाद या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण निषाद हा इयत्ता दूसरी वर्गात शिकत होता. करण शनिवारी शाळेत गेला होता त्यांनतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आईनं कुर्ल्यातील विनोबा भावे पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. मात्र तो राहत असलेल्या घराजवळील एका शिधावाटप दुकानात त्याचा मृतदेह सापडला. 


पोलिसांना आता अधिक तपास सुरू केलाय. चोवीस तासाच्या आत दोन लहान मुलांचे मृतदेह सापडल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.पोलीस मात्र या घटनेकड़े गांभीर्यानं पाहत नसल्याचं दिसतंय. कारण हां अपघात असू शकतो असं सांगून त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र करणच्या आईनं खून झाल्याचा आरोप केलाय.