आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय - मुख्यमंत्री
विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
मुंबई : विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलंय. विरोधकांना बाहेर ठेवून विधीमंडळाचं कामकाज चालवण्यात सरकारला रस नाही. त्यामुळं सभापतींशी चर्चा करुन निलंबन मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
18 मार्चला अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं, तसंच सभागृहाचा अवमान करणं, या कारणांवरुन 31 डिसेंबरपर्यंत या आमदारांचं निलंबन करण्यात आलंय. मात्र आता या आमदारांचं निलंबन मागे घेण्याचे सकारात्मक संकेत मुख्यमंत्र्यांनीच दिलेत.