मुंबई : वजन कमी कऱण्यासाठी मुंबईत उपचार घेत असलेली इमान अहमदने तब्बल अर्धे वजन कमी केले असले तरी ती स्वत:च्या पायावर मात्र उभी राहू शकणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन महिन्यांपासून इमानवर उपचार सुरु आहेत. जेव्हा ती उपचारासाठी मुंबईत आली तेव्हा तिचे वजन ५०० किलो होते. गेल्या दोन महिन्यात तिने जवळपास २४२ किलो वजन घटवलंय. 


मात्र इतकं वजन घटवल्यानंतरही इमान तिच्या पायावर मात्र उभी राहू शकणार नाहीये. ११व्या वर्षी तिला लकव्या त्रासामुळे तिच्या पायाची वाढ थांबली होती. गेल्या २५ वर्षांपासून ती बेडवर असल्याने ही स्थिती अधिकच बिघडलीये.