मुंबई : उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटर्सवर मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्यूससोबत जास्त बर्फाची विशेष मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेनं बर्फाची तपासणी केली. यांतील ९६ टक्के नमुने दूषित आढळलेत. १४ प्रभागातील १०० टक्के नमुने दूषित होते. 75 टक्के बर्फात ई कोलाय हा विषाणू आढळलाय. हा विषाणू आरोग्याला धोकादायक आहे.