मुंबई : दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नयेत, असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या तीन महिन्यात या आदेशांची अंमलबजावणी करावी असे आदेश न्यायालयाने राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि MSRDC ला दिलेत.


२००८ सालीही मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने फ्लायओव्हर ब्रीज खाली गाड्या पार्क करु नयेत, असे आदेश दिले होते. पण ते आदेश पाळले गेले नाहीत.