मुंबई : मसालेदार पाणीपुरी खाताना त्या पाण्याची चव कळणं अशक्य आहे. खाणाऱ्याला कळणारही नाही की किती जंतू त्याच्या पोटात जात आहेत. हायकोर्टानं यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेला ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकेवर हायकोर्टासमोर सुनावणी झाली त्यावेळी हायकोर्टानंही चिंता व्यक्त केली आहे.


मुंबईसह राज्यातील इतर महानगरातील विहिरींतून बेकायदेशीरपणे पाणी उपसून ते टँकरमार्फत हॉस्पिटल्स, हॉटेल, शिक्षणसंस्था, निवासी इमारती, कॉर्पोरेट कंपन्या अश्या सर्व ठिकाणी पुरवले जाते. 


हे पाणी पिण्यायोग्य नसून ते केवळ घरघुती कामांकरता वापरण्यासाठी असते. मात्र हेच पाणी मुंबईच्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांकडून सर्रासपणे वापरले जाते. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सर्वांना प्रिय असणारे पाणीपुरी, सरबत, छास व इतर पदार्थांचं सेवन करताना अनेक घातक जीवाणू आपल्या पोटात जातात. ज्यामुळे अतिसार, ताप यांसारखे साथीचे आजार पसरण्यास मदत होते.