डबलडेकरच्या गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानींसाठी दिलासा देणारी बातमी. कोकणच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे.
मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानींसाठी दिलासा देणारी बातमी. कोकणच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे.
सध्या ही गाडी पहाटे साडे पाच वाजता लोकमान्य टिळक टर्मिनिस म्हणजेच कुर्ला टर्मिनसहून सुटते. ही दूरच्या उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांसाठी गैरसोयची होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच या गाडीला कमी प्रतिसाद मिळत होता.
ऐन गणपतीच्या तोंडावर जास्तीत जास्त लोकांना गाडीचा फायदा घेता यावा यासाठी उत्सवाच्या आधीच वेळेबदल होण्याची शक्यताय. काहीच दिवसांपूर्वी या गाडीची क्षमता दुपट करण्यात आली होती.