खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात शिक्षणमंत्री घेणार सुनावणी
खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.
मुंबई : खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यातल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून मुंबईत शिक्षणमंत्री फीवाढीविरोधात सुनावणी घेणार आहेत. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतक चर्नी रोड येथिल शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक आणि शाळांचे संस्थाचालक यांच्यात सुनावणी होणार आहे.
मुंबईतही खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीसाठी मुंबईतील पालकही हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनावणीनंतर काय तोडगा निघतो याकडे सर्व पालकांचे लक्ष आहे.