मुंबई : अनेक वादात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. खडसे यांनी काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, काल रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले होते. रात्री त्यांनी पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्याआधी दुपारी वर्षावर मुख्यमंत्री फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काहींशी याच विषयावर चर्चा झाली. या निर्णयानंतर खडसे यांनी राजीनामा देण्याचे ठरल्याचे म्हटले जात आहे.