मुंबई : राज्यातील उद्योगांना विभाग निहाय सवलत मिळणार आहे. ही सवलत पुढील तीन वर्षांसाठी ही सवलत दिली जाणार आहे. 


पाहू या काय आहे वैशिष्ट्ये...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- तीन वर्षांसाठी दिली जाणार सवलत
- विभागनिहाय वेगवेगळी सवलत
- विदर्भातील उद्योजकांना सगळ्यात जास्त वीज दरात सवलत
- तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला सर्वात कमी सवलत
- 1 एप्रिल 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही सवलत


विदर्भातील उद्योजकांना सवलत - 


इंधन समायोजन आकारात प्रति युनिट 40 पैसे सूट, नवीन उद्योजकांसाठी 75 पैसे प्रति युनिट सूट, लोड फॅक्टरवर आधारित प्रोत्साहनपर सवलत 30 पैसे ते 1 रुपया 52 पैशांपर्यंत सवलत, नॉन कन्टीन्युअस 30 पैसे ते 1 रुपया 12 पैसे सूट, लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठी 1 रपया ते 1 रुपया 65 पैसे सूट 


मराठवाड्यातील उद्योजकांना सवलत -  


इंधन समायोजन आकारात प्रति युनिट 30 पैसे सूट, नवीन उद्योजकांसाठी 75 पैसे प्रति युनिट सूट, लोड फॅक्टरवर आधारित प्रोत्साहनपर सवलत 25 पैसे ते 1 रुपयांपर्यंत सवलत, नॉन कन्टीन्युअस 25 पैसे ते 1 रुपया सूट, लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठी 80 पैसे ते 1 रुपया 45 पैसे सूट 


उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना सवलत -  


इंधन समायोजन आकारात प्रति युनिट 20 पैसे सूट, नवीन उद्योजकांसाठी 50 पैसे प्रति युनिट सूट, लोड फॅक्टरवर आधारित प्रोत्साहनपर सवलत 10 पैसे ते 25 पैसे सवलत, नॉन कन्टीन्युअस 10 पैसे ते 95 पैसे, लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठी 40 पैसे ते 95 पैसे सूट


पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील उद्योजकांना सवलत -  


इंधन समायोजन आकारात सवलत नाही, नवीन उद्योजकांसाठी 50 पैसे प्रति युनिट सूट, लोड फॅक्टरवर आधारित प्रोत्साहनपर सवलत 5 पैसे ते 20 पैसे सवलत, नॉन कन्टीन्युअस 5 पैसे ते 20 पैसे, लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठी 10 पैसे ते 60 पैसे सूट