मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उद्या निकाली निघण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी 'बेस्ट'वर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्ट कर्मचाऱ्यांमधल्या वाढत्या असंतोषाकडे बघून मुंबईच्या महापौरांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा सोडवण्यासाठी उद्या तातडीची बैठक बोलावलीय.


या बैठकीत सर्व गटनेते, बेस्ट समिती अघ्यक्ष, बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करुन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत निर्णय घेतला जाईल.


'बेस्ट'नं कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी देना बँकेकडून 60 करोड तर युनायटेड बँक ऑफ इंडियाकडून 100 करोडोंचं कर्ज घेतल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिलीय. कोर्टानं २५ मार्चपर्यंत पगार करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन पगार दिले जातील.