मुंबई : देशभरातील चार प्रमुख महानगरांना जोडणा-या महामार्गावरुन जवळपास सहा हजार किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार करणा-या नाशिकच्या महाजन बंधूंचा एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी गौरव केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. महेंद्र महाजन आणि डॉ. हितेंद्र महाजन या बंधूंनी दहा दिवसांमध्ये हा विक्रमी प्रवास करत नियम पाळा, भारत घडवा असा संदेश जनतेला दिला. दहा दिवसात 6हजार किलोमीटर सायकल रिले पद्धतीनं चालवण्याचा विक्रम या बंधूनी प्रस्थापित केला असून त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद केली जाणार आहे. 


या प्रवास दरम्याम कुठेही असहिष्णुता जाणवली नाही, नोटबंदीचाही परिणाम जाणवला नाही आणि प्रगतशील भारताला साजेसे रस्ते चांगले होते असा अनुभव महाजन बंधूंना आला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'रेस एक्रॉ़स अमेरीका' सायकलिस्ट महाजन बंधूंचं कौतुक केलं होतं.



सायकल कॅपिटल असलेल्या नाशकातील या बंधूंचा सकारात्मक दृष्टिकोन आणि निस्वार्थी भावनेने केलेला हा प्रवास कौतुकास्पद आहे अशा शब्दांमध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाषचंद्रा यांनी कौतुक केलं. या कौतुक सोहळ्यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर हे उपस्थित होते.