एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. याचा फटका कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांना बसत आहे.
मुंबई : एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. याचा फटका कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांना बसत आहे.
लोअर परेल स्टेशनजवळ यार्डातून बाहेर निघत असताना एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरुन घसरला. पहाटे ३ वाजता ही घटना घडलीय. रुळांवरुन डबा हटवण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, वाहतूक विस्कळीत झाल्याने स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवल्याने सकाळी सकाळीच मुंबईकरांचे हाल होतायत. फास्ट ट्रॅकवरील गाड्यांना याचा फटका बसलाय.
ठळक बाबी
- पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुपारचे बारा वाजण्याची शक्यता
- लोअर परेलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ यार्डात जाणा-या एक्सप्रेसचा डब्बा घसरला, प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन वरील वाहतूक पूर्णपणे बंद.
- पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोअर परळ स्टेशनजवळ बोगी रुळावरुन घसरली, धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली