मुंबई : मुंबई नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार आहे.. जमीन देणा-या प्रत्येक शेतक-याला किंवा मालकाला सुधारित अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिवर्ष एकरी तीस हजार रुपये ते साठ हजार रुपयांपर्यंत पुढील दहा वर्षांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. शेतजमीन जिरायती असल्यास प्रति हेक्टर 75 हजार म्हणजेच एकरी 30 हजार तर बागायत जमीनीसाठी हेक्टरी 1 लाख 50 हजार रुपये म्हणजेच एकरी 60 हजार रुपये मोबदला म्हणून देण्यात येणार आहेत.. 


हंगामी बागायती जमीन हेक्टरी 1 लाख 12 हजार 500 रुपये म्हणजेच एकरी 45 हजार अशा पद्धतीने पुढची 10 वर्ष अनुदान देणार आहेत.. यांत दर वर्षी दहा टक्क्याने वाढ करण्यात येणार आहेत..त्याप्रमाणे जे जमीन देणार त्यांना या महामार्गाच्या लगत उभ्या राहणाऱ्या नवीन 24 नगरामध्ये 25 ते 30 टक्के विकसित भूखंड देखील मिळणार आहे.. 


मुख्यमंत्र्यांच्या या  महत्वकांक्षी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता