मानखुर्दमधील झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण
मानखुर्दमधील मंडाला झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात तब्बल १२ तासांनी यश मिळालेय. सकाळी सातच्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
मुंबई : मानखुर्दमधील मंडाला झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात तब्बल १२ तासांनी यश मिळालेय. सकाळी सातच्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
गुरुवारी संध्याकाळी ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २७हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही भीषण आग विझवण्यासाठी तब्बल १२ तास लागले. या दुर्घटनेत २ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
इथे असलेल्या केमिकल गोदामांमुळे ही आग मोठ्य़ा प्रमाणात भडकली. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात लाकडाच्या वखारीही आहेत. आगीमुळे सध्य़ा या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरलं होतं.
मानखुर्द स्टेशनला लागून असलेला हा परिसर दाटीवाटीचा आहे त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडथळे येत होते. आगीमुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीलाही अडथळे येत होते