मुंबई : ई-कॉमर्समधील अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघा़डीच्या ऑनलाईन विक्री कंपन्यांचा मेगा सेल जाहीर करण्यात आलाय. घरबसल्या शॉपिंगचा नवा पर्याय उपलब्ध करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेदी करायला कोणाला आवडत नाही. मनासारखी खरेदी झाली की मुडही मस्त बनतो. त्यात सध्या लग्नाचा सिझन आहे. बच्चे कंपनीला सुटी आहे. व्हॅकेशनमुळे महिला वर्गही रिलॅक्स आहे. समर शॉपिंगची मजा अनुभवयाची असेल तर तुम्हाला एक संधी आहे. त्यातही घरच्या घरी शॉपिंगचा उत्तम पर्याय म्हणजे ऑनलाईन कनेक्ट होणे. ही संधी दिलेय अँमेझॉन, फ्लिपकार्टने.


अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघा़डीच्या ऑनलाईन विक्री कंपन्यांनी आपला मेगा सेल जाहीर केलाय. अॅमेझॉनवर सिटी बँक कार्डची तर फ्लिपकार्टवर एचडीएफसी कार्डची कॅश बँक आणि डिस्काऊंट सुविधा आहे.