मुंबई : टाटा समुहाने मीडियाची माफी मागितली आहे. यासाठी टाटा समुहाने एक पत्र लिहिलं आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार नेहमीच त्यांचं कर्तव्य बजावत असतात, पत्रकारांच्या कामाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक असतं, यापुढे असा प्रकार घडणार नाही, तसेच या घटनेबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं टाटा समुहाने म्हटलं आहे.


टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. सायरस मिस्त्री बॉम्बे  हाऊस मध्ये दाखल झाले, त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले.


अनेकजण सायरस मिस्त्रींसोबत आतपर्यंत गेले आणि याचाच बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांना राग आल्यानं धक्कबुक्की करण्यात आली.