मुंबई : दीड दिवसाच्या गणपतींना अखेर आज भावपूर्ण निरोप देण्यात येतोय. दादर आणि गिरगावच्या चौपाटीवर घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादर चौपाटीवर गणेश विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर गिरगाव चौपाटीवर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. गिरगाव, जुहू, दादर चौपाट्यांवर 50 हज़ार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दीड दिवसाच्या जवळपास दीड लाख गणेश मूर्तींचं मुंबईत विसर्जन होत असतं..
विसर्जनासाठी चौपाट्यांवर व्यवस्था करण्यात आली आहे.


प्लास्ट ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे होणारं पाण्याचं प्रदूषण लक्षात घेऊन गणेश विसर्जनासाठी मुंबईत कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलीय. या तलावांमध्ये मूर्तीचं विसर्जन केल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. त्यामुळं भक्तांनी बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावं असं आवाहन करण्यात आलंय.