मुंबई : महापौर पदाची निवडणूक 8 मार्चला होत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीसाठी एक एक मत महत्वाचे आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना एकमेकांना शह देण्यासाठी अपक्षांना गळाशी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी सेनाभवनात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होत्या. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेणार होत्या. मात्र, शिवसेनेबरोबरची बोलणी फिस्कटली. त्याआधी त्यांना भाजपकडून आमदार आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्याकडून संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.


ठळक बाबी :


- गीता गवळी यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी आज रात्री वर्षावर बोलवलं.


- प्रथम वर्षी आरोग्य समिती अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समिती सदस्य पदाची गीता गवळी यांची मागणी.
 
- मुख्यमंत्र्यांच्या दाबावामुळे गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिस्कटली.


- त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या.


- आज रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती.