सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त
सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता.
मुंबई : सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता.
असोचेमनुसार, या वर्षी सोने २५ टक्क्यांनी महागले. मात्र गेल्या आठवड्यात याची झळाळी दीड ते हजार रुपयांपर्यंत कमी झाली. चार दिवसांमध्ये किंमत १०१० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. अहवालानुसार, गेल्या आठवड्यादरम्यान बाजारपेठेत सोन्याची विक्री ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत घसरली.
कशामुळे झाली घसरण :
उत्पादन शुल्काविरोधात मार्च-एप्रिलमध्ये सराफांनी ४२ दिवसांचा संप केला होता. १० टक्के अबकारी कर सुरू राहणे आदी.
जागतिक संकेतानुसार दिवाळीपर्यंत सोन्यात मोठ्या तेजीची शक्यता नाही. मात्र, दिवाळीनंतर सोने २००० रु. प्रति दहा ग्रॅमपर्यंत महागणे शक्य.
आयातही ५८ % घटली : यावर्षात पहिल्या नऊ महिन्यांदरम्यान याच्या अायातीत ५७.७५ टक्के घसरण आली. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत २७० टन आयात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ६५८ टन होती.
ऑक्टोबर ३०३२०
ऑक्टोबर ३०५२०
ऑक्टोबर ३०२४०
ऑक्टोबर ३०४९०
ऑक्टोबर ३१२५०