मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आणि दिवावासीयांसाठी खुषखबर आहे. नोव्हेंबरपासून दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवा रेल्वे स्टेशनला जलद लोकल थांबण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे.  ऑक्टोबर अखेरपर्यंत हे काम संपेल. त्यानंतर नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेवरच्या फास्ट लोकल दिवा स्टेशनवर थांबणार आहे्त. 


सुरूवातीला दिवसभरात फक्त 10 फास्ट लोकलचे हॉल्ट दिले जातील. दरम्यान, दिव्यात वाढती गर्दी लक्षात घेता आणि प्रवाशांची मागणी याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी दिवा येथे प्रवाशांना रेल्वे चढता येत नसल्याने आंदोनल झाले होते. दगडफेकीचा प्रकारही झाला होता. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याची दखल घेतली. त्यानंतर दिवा येथे नवीन प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येत आहे.