मुंबई : 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून रद्द झाल्यानंतर ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी चांगले पाऊल उचलले आहे. खासगी बॅंक आयसीआयसीआयने 31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क एटीएममधून पैसे काढन्याची मुभा दिलेय. दुसरीकडे उद्यापासून एटीएममधून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला 500 आणि 2000च्या नवीन नोटा मिळू शकतील. तसेच 100 रुपयांच्या नोटाही मिळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीआयसीआय बॅंक 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएमवर 5 ट्रॅन्झॅक्शन मोफत होते. मात्र आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा ट्रॅन्झॅक्शन करता येणार आहे. 


आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना क्रेडिट कार्डाची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवली आहे. तर डेबिट कार्डावरील दैनंदिन खरेदीवरील सीमा शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.