मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तासात मोठ्या चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.


१७ तारखेला कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात १९ जूननंतर मान्सूनच्या पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज आहे.


हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला, तर बहुतांश महाराष्ट्राची पाण्याची आस भागेल आणि जनतेला दिलासा मिळणार आहे.