पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर
वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लोकलच्या फे-या आणि डब्ब्यांची संख्या वाढवण्याच्या शिफारशी करण्यात आल्यात. त्यानुसार नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्ब्याच्या चौदा फे-या वाढवण्यात येणार आहेत.
मुंबई : वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लोकलच्या फे-या आणि डब्ब्यांची संख्या वाढवण्याच्या शिफारशी करण्यात आल्यात. त्यानुसार नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्ब्याच्या चौदा फे-या वाढवण्यात येणार आहेत.
सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वेवर दररोज 1332 लोकलच्या फे-या चालवण्यात येतात. त्यापैकी तीस फे-या या पंधरा डब्ब्यांच्या लोकलच्या असतात.
पंधरा डब्ब्याच्या लोकलची संख्या वाढल्यामुळे प्रवासी वहनक्षमता वाढणार आहे.. अशा एका लोकलमुळे 25 टक्के जास्त प्रवासी प्रवास करु शकतील.