मुंबई : आज चैत्र शुद्ध प्रतिपदा... मराठी नवीन वर्षांचा पहिला दिवस... यालाच गुढीपाडवा आणि वर्षप्रतिपदा असही म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडे-तीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण आहे. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो या ठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढी उभारल्या जातात. श्री प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास संपवून लंकेचा अधिपती रावणाचा वध करुन विजयी होऊन जेव्हा अयोध्येत परतले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा... अयोध्या नगरी रामाच्या या विजयाने आनंदून गेली होती. रामाच्या विजयी होऊन परतण्याचा आनंद म्हणून घरोघरी गुढी उभारल्या जातात, अशा अनेक आख्यायिका आहेत. 


या दिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात श्रीखंड पुरी, शेवयांची खीर असा बेत आखला जातो. गेली 19 वर्ष डोंबिवलीत नवीन वर्षाच्या स्वागताची अविरत सुरू आहे. 


आजही सकाळी सात वाजल्यापासून डोंबिवलीतल्या स्वागत यात्रेला सुरूवात झालीय. तिकडे ठाणे, गिरगावातही गेल्या जवळपास दशकभरापासून शोभा यात्रेचं आयोजन करण्यात येतं. कोपीनेश्वर मंदिरापासून ठाण्यातल्या स्वागतयात्रेला सुरूवात झालीय. यावेळी आमदार एकनाथ शिंदे, संजय केळकर उपस्थित आहेत.